सोलापूर : अळ्या दिसल्या तरीही पोषण आहार प्रयोगशाळेत
सोलापूर, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडीमधून गर्भवती महिला व लहान बालकांसाठी वितरित करण्यात आलेल्या पोषण आहारात अळ्या, जाळ्या, किडे आढळून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी शेलगाव (मा) येथील त्या अंगणवाडीला भेट देऊन सर्वांसमक्ष
सोलापूर : अळ्या दिसल्या तरीही पोषण आहार प्रयोगशाळेत


सोलापूर, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडीमधून गर्भवती महिला व लहान बालकांसाठी वितरित करण्यात आलेल्या पोषण आहारात अळ्या, जाळ्या, किडे आढळून आल्यानंतर अधिकाऱ्यांनी शेलगाव (मा) येथील त्या अंगणवाडीला भेट देऊन सर्वांसमक्ष तपासणी केली. तपासणीत पोषण आहाराच्या पुड्यात अळ्या, जाळ्या व किडे आढळून आले. अधिकाऱ्यांनी तो पोषण आहार तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवला आहे. वास्तविक प्रत्यक्ष पाहणीत आहार निकृष्ट असल्याचे सिध्द झाले असताना प्रयोगशाळेत कशासाठी पाठवला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराबाबत बाल विकास प्रकल्पाचे अधिकारी नेमके कोणती कारवाई करणार, याकडे तालुक्यातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत. बार्शी तालुक्यातील अंगणवाडीमधून वितरित करण्यात आलेल्या पोषण आहारामध्ये चक्क अळ्या व किडे असल्याचे बाब शेलगाव येथील नागरिकांनी समोर आणली होती. हा प्रकार प्रशासनासमोर मांडून महिलांचे व बालकांच्या पोषणाच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे दाखवून दिले होते. त्यानंतर बार्शी पंचायत समितीचे महिला व बालविकास अधिकारी समाधान नागणे, तक्रारदार विकास बारबोले, उमेश मारकड, राजाबाई पिसाळ, मंदाकिनी शिंदे यांच्यासह स्थानिक नागरिकांसमोर अंगणवाडीमध्ये शिल्लक असलेल्या शालेय पोषण आहाराचे पुडे तपासण्यात आले. अतिशय निकृष्ट शालेय पोषण आहार असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने गावामध्ये वितरित करण्यात आलेल्या महिलांकडून व बालकांकडून तो पोषण आहार परत घेण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande