सोलापूर - महूद परिसरात खासगी सावकारकीचे वाढले प्रस्थ
सोलापूर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। सांगोला तालुक्यातील महूद परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, शेतकरी यांच्या मानगुटीवर खासगी सावकारकीचे मोठे भूत बसले आहे. हे खासगी सावकार सुमारे 40 टक्केहून अधिक दराने अडलेल्या व्यावसायिकांना कर्ज देऊन त्यांचे
सोलापूर - महूद परिसरात खासगी सावकारकीचे वाढले प्रस्थ


सोलापूर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। सांगोला तालुक्यातील महूद परिसरामध्ये सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, शेतकरी यांच्या मानगुटीवर खासगी सावकारकीचे मोठे भूत बसले आहे. हे खासगी सावकार सुमारे 40 टक्केहून अधिक दराने अडलेल्या व्यावसायिकांना कर्ज देऊन त्यांचे आर्थिक शोषण करत आहेत. वेळप्रसंगी मारहाणीच्या अनेक घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिकांच्या त्रासातून सर्वसामान्यांची सुटका करावी, अशी मागणी केली जात आहे.

महूद येथे खासगी सावकारकीचे मोठे स्तोम माजले आहे. परिसरातील वाड्या-वस्त्या आणि छोटी-मोठी गावे मिळून सुमारे 25 ते 30 गावांचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून महूद ओळखले जाते. येथे भुसार मालाची तसेच इतर विविध साहित्यांची मोठी बाजारपेठ आहे. शेतकरी, शेतमजूर त्याचबरोबर छोट्या व्यवसायांची या परिसरात मोठी संख्या आहे. अनिश्चित नैसर्गिक परिस्थितीमुळे मजुरांना नेहमीच काम मिळेल असे नाही. छोट्या-छोट्या व्यावसायिकांनाही भांडवलासाठी अशा खासगी सावकारांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे येथील मुख्य चौक परिसर तसेच सर्वत्र खासगी सावकारांचे मोठे स्तोम माजले आहे. हे सावकार त्यांच्या मनाला वाटेल त्या दराने कर्जपुरवठा करत असतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande