सोलापूरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परिचारकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
सोलापूर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)।सुधाकरपंत परिचारक यांनी आपल्या कर्माने, नेतृत्वाने मोठेपण सिद्ध केले होते. लोक त्यांना आदराने मालक म्हणत असले तरी, त्यांचा भाव सेवेकऱ्‍याचा होता. अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कर्मयोगी सुधाकर
सोलापूरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परिचारकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण


सोलापूर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)।सुधाकरपंत परिचारक यांनी आपल्या कर्माने, नेतृत्वाने मोठेपण सिद्ध केले होते. लोक त्यांना आदराने मालक म्हणत असले तरी, त्यांचा भाव सेवेकऱ्‍याचा होता. अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारती समोर सुधाकरपंत परिचारक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी मंचावर पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, आमदार दिलीप सोपल, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार राजू खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande