साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची होणार अचानक तपासणी – साखर आयुक्त
पुणे, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यातील गाळप हंगाम 2025-26 हा दिनांक 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणीकरिता शेतकरी संघटनांकडून सतत मागणी होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून भरारी पथकांची स्थापना करून त्यांच्या
साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची होणार अचानक तपासणी – साखर आयुक्त


पुणे, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। राज्यातील गाळप हंगाम 2025-26 हा दिनांक 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणीकरिता शेतकरी संघटनांकडून सतत मागणी होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून भरारी पथकांची स्थापना करून त्यांच्यामार्फत ऊस वजनकाट्यांची तपासणी करण्याची कार्यवाही करावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नुकत्याच दिल्या आहेत. भरारी पथकांमध्ये सर्व संबंधित घटकांचे प्रतिनिधी घेऊन अचानक भेटी देऊन वजनकाट्यांची तपासणी करण्यात यावी तसेच गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.वजनकाट्याच्या तपासणीमध्ये काही गैर कायदेशीर बाबी आढळल्यास सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. ऊस वजनकाटा कॅलिब्रेशनमध्ये फेरफार करून ऊस वजन काटामारी केली जाते, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. यासाठी ऊस वजनकाटा कॅलिब्रेशन करून सील करणे आवश्यक आहे. संबंधित वैद्यमापन अधिकाऱ्याने वजनकाट्याची तपासणी करतेवेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन ऊस वजनकाटे कॅलिब्रेशन झाल्यानंतर सील करावेत, अशाही सूचना साखर आयुक्त डॉ. कोलते यांनी दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande