सोलापूर : सात हजार विद्यार्थ्यांना मिळणार शालेय साहित्य
सोलापूर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। अतिवृष्टी, पुरामुळे जिल्ह्यातील बारा ते तेरा हजार कुटुंब बाधित झाले आहेत. त्यामध्ये सात हजार विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य खराब तसेच वाहून गेले आहे. त्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षण घेता यावे, यासाठी जिल्हा परिषदेचे
सोलापूर : सात हजार विद्यार्थ्यांना मिळणार शालेय साहित्य


सोलापूर, 16 ऑक्टोबर, (हिं.स.)। अतिवृष्टी, पुरामुळे जिल्ह्यातील बारा ते तेरा हजार कुटुंब बाधित झाले आहेत. त्यामध्ये सात हजार विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य खराब तसेच वाहून गेले आहे. त्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षण घेता यावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शालेय साहित्य वाटप उपक्रम आजपासून सुरुवात केली आहे. त्यामुळे पूरग्रस्त बाधित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळणार आहे.

यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने सीना, कोळेगाव, भीमा आणि बोरी नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावात पाणी जाऊन घरे, शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी, ग्रामपंचायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून अहवाल शासनाकडे पाठविला आहे. मात्र, या पुरात विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सीईओ जंगम यांनी पुढाकार घेऊन अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्था, एनजीओ आदींच्या माध्यमांतून शालेय साहित्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा शिक्षण घेता येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande