लातूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।
अहमदपूर येथील वैशाली
बुद्ध विहार लवकरात लवकर पूर्ण होईल , या विहारामुळे परिसरातील नागरिकांसाठी एक नवीन आध्यात्मिक आणि सामाजिक केंद्र उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी येथे केले आहे.
अहमदपूर तालुक्यातील आजनी खुर्द गावामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभमुहूर्तावर वैशाली बुद्ध विहारच्या भूमीपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या भूमिपूजनास सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन समारंभ पार पडला.
या भूमिपूजन समारंभाचे अध्यक्ष पूज्य भंते धम्मबोधी; तसेच यावेळी कार्यक्रमासाठी माजी खासदार सुनीलराव गायकवाड, माजी सरपंच साहेबराव जाधव उपासक आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis