परभणी, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।पाथरी तालुक्यातील कासापुरी,हादगाव, बाभळगाव या तीन महसुल मंडळात २६,२७ सप्टेबर रोजी अतीवृष्टी झाली होती. याची स्कायमेट च्या पर्जन्यमापकात नोंदच झाली नसल्याने पिकविमा मिळणार नाही अशी शेतक-यांची भावना झाल्याने स्कायमेट विरोधात कासापुरी मंडळातील शेतक-यांनी ढालेगाव बंधा-यात चार तास जलसमाधी आंदोलन केले. या वेळी तहसिलदार हांदेश्वर यांनी आंदोलक शेतक-यांची भेट घेत लेखी आश्वासन दिल्या नंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis