अकोला, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।लोकजागरच्या दिवाळी अंकाचे सोमवारी अकोल्यात थाटात प्रकाशन करण्यात आले. यावेळी आमदार वसंत खंडेलवाल, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे, शिवसेनेचे पश्चिम विदर्भाचे कायदे विभाग प्रमुख ॲड.अनिल काळे, प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, भारत एक कदमचे संस्थापक इंजिनियर अरविंद देठे, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक ढेरे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाचकवडे, डॉ. विनय दांदळे, लोकजागरचे कार्यकारी संपादक नीरज आवंडेकर, संजय चौधरी, संपादक ॲड. सुधाकर खुमकर, दिलीप पीवाल, ॲड. जयेश गावंडे आदींची उपस्थिती होती.
लोकजागरचा हा दिवाळी अंक बाप विशेष असून महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांच्या कथा आणि कवितांचा या अंकात समावेश आहे. अंकाची उत्कृष्ट मांडणी आणि त्यातील दर्जेदार साहित्याचे सर्व मान्यवरांनी याप्रसंगी कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे