पुणे, 20 ऑक्टोबर (हिं.स.)30 कोटींहून अधिक जुन्या दस्तांचेही डिजिटायझेशन करून ते ऑनलाइन डिजिटल स्वाक्षरी स्वरूपात नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. या कामासाठी ६२ कोटी खर्च अपेक्षित असून, त्यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.राज्यात नोंदणी मुद्रांक विभागात १८६५ ते २००१ या काळात दस्त नोंदणी पारंपरिक पद्धतीने केली जात होती, तर १९२७ ते २००१ या काळात हे दस्त फोटो फिल्मच्या स्वरूपात जतन करण्यात येत होते. राज्यात दुय्यम निबंधक कार्यालयांची संख्या ५१७ इतकी आहे. या कार्यालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचे रेकॉर्ड उपलब्ध आहेत. जुन्या दस्तऐवजांचे हे रेकॉर्ड सांभाळून ठेवण्याचे काम कठीण होत चालले आहे. त्या पार्श्वभूमीवर, नोंदणी व मुद्रांक विभागाने या दस्तांच्या संवर्धनाचा निर्णय घेतला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु