परभणीत मंगळवारी ‘स्वरमयी दिवाळी’ची दुहेरी पर्वणी
परभणी, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळीच्या आनंदोत्सवात सुरेलतेचा रंग भरण्यासाठी परभणी शहर महानगरपालिका आणि अनिकेत सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा ‘स्वरमयी दिवाळी’ कार्यक्रमाची दुहेरी पर्वणी सजली आहे. दिनांक २१ व २२ ऑक्टोबर रोजीचे हे दोन्ही कार्यक्
1


परभणी, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।

दिवाळीच्या आनंदोत्सवात सुरेलतेचा रंग भरण्यासाठी परभणी शहर महानगरपालिका आणि अनिकेत सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा ‘स्वरमयी दिवाळी’ कार्यक्रमाची दुहेरी पर्वणी सजली आहे. दिनांक २१ व २२ ऑक्टोबर रोजीचे हे दोन्ही कार्यक्रम वसमत रस्त्यावरील राजगोपालाचारी उद्यानात होणार आहेत.

उत्सवांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या परभणीत दरवर्षी या उपक्रमाद्वारे संगीत, मैत्री आणि आनंद यांचा संगम घडवला जातो. नागरिकांमध्ये उत्साह, एकोपा आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे. या परंपरेला पुढे नेत यंदा प्रशासक तथा आयुक्त नितीन नार्वेकर आणि त्यांच्या टीमने या सांस्कृतिक सोहळ्याला अधिक वैभवशाली बनविले असून, दोन भव्य संगीत मैफिलींचे आयोजन करण्यात आले आहे.

‘स्वरमयी दिवाळी सांज’

मंगळवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता स्वररत्न लक्ष्मीकांत (राजू) काजे आणि दीपा काळे, लक्ष्मी लहाने यांच्या सुरेल गाण्यांनी दिवाळीच्या वातावरणात नवचैतन्य फुलविणारा हा कार्यक्रम रंगणार आहे.

‘स्वरमयी दिवाळी पहाट’

बुधवार, दि. २२ ऑक्टोबर (दिवाळी पाडवा) रोजी सकाळी ६.३० वाजता सुविख्यात गायक नागेश आडगावकर यांच्या सुरेल सादरीकरणाने नव्या पहाटेची सुरुवात सुरमयी होणार आहे. या मैफिलीत स्थानिक स्वररत्न लक्ष्मी लहाने यांचाही विशेष सहभाग राहणार आहे. दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन वसमत रस्त्यावरील राजगोपालचारी उद्यानात करण्यात आले आहे. संगीत आणि सणांचा संगम अनुभवण्यासाठी परभणीतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दिवाळीच्या स्वरपर्वणीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयुक्त नितीन नार्वेकर, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande