नाशिक : दिवाळी निमित्त स्वरोत्सव
नाशिक, 20 ऑक्टोबर (हिं.स.) : दिवाळी म्हणजे आनंदोत्सवाचे पर्व होय. वसुबारस, धनत्रयोदशी पारंपरिक पद्धतीने साजरी झाली. दिवाळी सणाला शहरात अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीपर्वात विविध संस्था व संघटनांच्या वतीने शहरात ठिकठ
नाशिक : दिवाळी निमित्त स्वरोत्सव


नाशिक, 20 ऑक्टोबर (हिं.स.) : दिवाळी म्हणजे आनंदोत्सवाचे पर्व होय. वसुबारस, धनत्रयोदशी पारंपरिक पद्धतीने साजरी झाली. दिवाळी सणाला शहरात अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीपर्वात विविध संस्था व संघटनांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी पाडवा पहाट व दिवाळी पाडवा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध गायक, कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी मैफली गाजविणार आहे.

संगीतप्रेमींसाठी दिवाळीत

होणाच्या सांगीतिक मैफलीत यंदा संगीत क्षेत्रातील दिग्गज मंडळी आपली कला सादर करणार आहेत. शहरातील काही संगीताची मैफली गाजविणार आहे

इच्छापूर्ती मित्रमंडळातर्फे दिवाळी सांज पाडव्याचे आयोजन येत्या बुधवारी (दि. २२) सार्यकाळी सहाला चेतनानगर येथील इच्छापूर्ती गार्डन येथे करण्यात आले आहे. अमोल पालेकर प्रस्तुत स्वाद स्वरांचीमध्ये पं. सुरेश वाडकर यांचे शिष्य ज्ञानेश्वर कासार, गायक चेतन लोखंडे, लोकसंगीत गायिका जागृती शृंगार, अभिनेत्री प्रांजली बिरारी-नेवासकर आपली कला सादर करणार आहेत.

संस्कृती नाशिकच्या दिवाळी पाडवा पहाटचे २७ वे पुष्प पद्मभूषण पै. उस्ताद राशीदखान यांचे पुत्र युवा उस्ताद अरमान खान यांच्या दमदार गायकीने गुंफणार आहेत. अरमान यांना उन्मेश बॅनर्जी (तबला) ओंकार अग्निहोत्री (संवादिनी) साथसंगत करतील. गेल्या ४८ नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ रंगभूषाकार माणिक कानडे यांना संस्कृती नाशिक पुस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा स्वर महोत्सव येत्या बुधवारी (दि. २२) पहाटे साडेपाचला ऐतिहासिक पिंपळपारावर होणार आहे.

नसती उठाठेव मित्रपरिवारातर्फे स्वर दीपावली पहाट कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि. २१) पहाटे साडेपाचला नरसिंहनगर, आकाशवाणी केंद्राजवळील हनुमान मंदिरात करण्यात आले आहे. यावेळी पं. राम मराठे यांचे नातू भाग्येश मराठे यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होईल. त्यांना स्वप्नील भिसे, सिद्धेश बिचोलकर संगत करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande