भाजपाच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड ठाकरे गटात प्रवेश
नाशिक, 20 ऑक्टोबर (हिं.स.) - भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड यांनी आज सोमवारी भव्य शक्ती प्रदर्शन करत ‘मातोश्री’ या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासद
भाजपाच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड ठाकरे गटात प्रवेश


नाशिक, 20 ऑक्टोबर (हिं.स.)

- भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड यांनी आज सोमवारी भव्य शक्ती प्रदर्शन करत ‘मातोश्री’ या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार संजय राऊत उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी.जी सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थितांशी संवाद साधताना महायुतीला चिमटे काढले.

ते म्हणाले की, “सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे. आज नरक चतुर्दशी असून, कृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकासूर कोण वेगळं सांगायची गरज नाही. आगामी निवडणुकीत आपल्याला महाराष्ट्रावरील भाजपचे नरकासूराचे संकट नेस्तनाबूत करायचे आहे. नाशिकमध्ये याच भाजपचा वध करण्यासाठी संगीता गायकवाड आणि इतर मंडळी शिवसेनेत आली आहेत. त्यामुळे आता हा प्रवाह सुरु झाला आहे”,असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “मी भाजपच्या सगळ्याच नेत्यांना विनंती करतो, आपण कसं विष पोसत आहात याकडे डोळे उघडून बघा. इतिहासात पापाचे धनी म्हणून स्वतःची नोंद होऊ देऊ नका. मी नाशिकमध्ये तसा आधीही येऊन गेलो आहे. मात्र, आता नाशिकमध्ये मी पुन्हा येईल, त्यावेळी भगवा फडकलेला असला पाहिजे. जे मतचोरी करुन तिकडे बसले आहेत त्यांची चोरी आपण चोरांसकट पकडली आहे. या चोरांना हद्दपार करण्यासाठी सर्व मराठी माणसे, अमराठी एकत्र आले आहेत. कारण हे कुणालाच आवडलेलं नाही”, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्यासह नाशिकरोड मंडल माजी अध्यक्ष हेमंत गायकवाड, प्रा.डॉ लक्ष्मण शेडगे, शिवांश फाउंडेशनच्या किमया बागुल, मराठा महासंघाच्या कार्याध्यक्ष रोहिणी उखाडे, प्रवीण पाटील, भाजपचे सातपूर पदाधिकारी अंकुश व्हावल,शिंदेंच्या शिवसेनेचे सत्यम खोले, हर्ष चव्हाणके आदींनी यावेळी शिवबंधन बांधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

_

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande