सोलापूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोहोळच्या बाजार पेठेत विविध वस्तू खरेदी साठी गर्दी वाढू लागली आहे. खरेदी साठी ग्रामीण भागातील कुटुंबे मोहोळ शहरात येतात. बाजार पेठेत खरेदी साठी आलेल्या ग्राहकांना मनमोकळे पणाने खरेदी करता यावी, त्यांची चोरी होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी बाजार पेठेत, कृषी उत्पन्न बाजार समिती, नरखेड व शेटफळ या ठिकाणी गणवेशधारी व साध्या वेशातील पोलिसांची गस्त सुरू केली असून, महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग चोरा विरोधात मोहीम तीव्र केली आहे.
मंगळवार, बुधवार व गुरुवार या मुख्य तीन दिवसाच्या दिवाळीच्या सणासाठी सोने-चांदी, साड्या, कपडे, मोबाईल, फराळाचे साहित्य खरेदीसाठी शहरातील मुख्य बाजार पेठेत गर्दी वाढू लागली आहे. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे आपला कार्यभाग साधतात. पैशाची पाकिटे, पर्स, मोबाईल, गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची चेन अशा वस्तूंची चोरी होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड