पिंपरी गावाच्सया विकासासाठी सदैव कटिबद्ध -आ संजय बनसोडे
लातूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।उदगीर तालुक्यातील पिंपरी येथील गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले आहेउदगीर तालुक्यातील पिंपरी येथे आमदार संजय बनसोडे यांचा भव्य सत्कार व विकास कामांचे लोका
अ


लातूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।उदगीर तालुक्यातील पिंपरी येथील गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले आहेउदगीर तालुक्यातील पिंपरी येथे आमदार संजय बनसोडे यांचा भव्य सत्कार व विकास कामांचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते

​​उदगीर तालुक्यातील पिंपरी या गावात नुकताच एक भव्य सत्कार समारंभ व विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उदगीरचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री संजय बनसोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण देखील मोठ्या थाटामाटात पार पडले.​या सोहळ्यास उदगीरचे माजी नगराध्यक्ष . राजेश्वर निटुरे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भरत भाऊ चांगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मुना पाटील मलकापूरकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.​कार्यक्रमाचे आयोजन गावकऱ्यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. पिंपरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन शिवशंकर पांडे, ग्रामस्थांच्या वतीने हा सत्कार समारंभ आणि लोकार्पण सोहळा पार पडला.​या कार्यक्रमात बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे सांगितले.

----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande