महा ई-सेवा ऑनलाईन केंद्रांचा मनमानी कारभार
सोलापूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। नातेपुते शहरात मोठ्या प्रमाणावर आपले सरकार सेवा केंद्र (महा ई-सेवा केंद्रे ) अनियमित आहेत. त्यामुळे मनमानी पद्धतीने बेकायदेशीरपणे राजरोसपणे सुरू आहेत. याबाबत तक्रारी दाखल झाल्याने या तक्रारीची दखल खुद्द जिल्हाधिकारी य
महा ई-सेवा ऑनलाईन केंद्रांचा मनमानी कारभार


सोलापूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।

नातेपुते शहरात मोठ्या प्रमाणावर आपले सरकार सेवा केंद्र (महा ई-सेवा केंद्रे ) अनियमित आहेत. त्यामुळे मनमानी पद्धतीने बेकायदेशीरपणे राजरोसपणे सुरू आहेत. याबाबत तक्रारी दाखल झाल्याने या तक्रारीची दखल खुद्द जिल्हाधिकारी यांनी घेऊन सात दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश माळशिरस तहसीलदार यांना दिला खरा, मात्र, महिना संपला तरी प्रांताधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचा आदेशावर माळशिरस तहसीलदार यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे अनियमित असलेली आपले सरकार सेवा केंद्रे राजरोसपणे मनमानी पद्धतीने सुरू आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशांची पायमल्ली केल्याचे दिसत आहे.नातेपुते शहरात जवळपास तीन महा ई-सेवा केंद्राना परवानगी आहे. असे असताना नातेपुते येथे चक्क ऑनलाईन केंद्राचा बाजार भरला असल्याचे चित्र आहे. माळशिरस तालुक्यातील मोरोची, फडतरी, दहिगाव, कोथळे या ठिकाणी असलेली सेवा केंद्रे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करून रोजरोजपणे नातेपुते शहरात व्यावसायिक पद्धतीने दुकाने थाटुन कारभार करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande