शनिवारवाड्याच्या आवारात नमाजपठण प्रकरणी गुन्हा दाखल
* पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याकडून तक्रार पुणे, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। शनिवारवाड्याच्या आवारात नमाज पठण केल्याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
शनिवारवाड्याच्या आवारात नमाजपठण प्रकरणी गुन्हा दाखल


* पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याकडून तक्रार

पुणे, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।

शनिवारवाड्याच्या आवारात नमाज पठण केल्याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारवाडा ऐतिहासिक स्मारकात आहे.

या ठिकाणी मनाई असताना तीन अनोळखी महिलांनी चटई अंथरूण नमाज पठण केले. शनिवारी दुपारी पावणेदोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान ही घडली. त्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी उशिरा याबाबत फिर्याद दिली. त्यानंतर या प्रकरण पोलिसांकडून प्राचीन स्मारके, पुरातत्वशास्त्रीय स्मारके आणि अवशेष कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

ऐन दिवाळीत शनिवारवाड्याच्या आवारात महिलांनी नमाज पठण केल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी समाज माध्यमात प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांच्यासह पतित पावन संघटनाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्याच्या आवारात रविवारी आंदोलन केले. शनिवारवाड्याच्या परिसरात कार्यकर्त्यांनी शिववंदना केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande