जुन्या नाशिकमधील 'त्या' घरावर फक्त तीन मतदारांची नोंद : डॉ. सरदेसाई
नाशिक, 20 ऑक्टोबर (हिं.स.) : जुन्या नाशिकमध्ये एकाच घरात ८०० मतदार असल्याचे वृत्त चुकीचे असून, त्या घरावर ८०० पेक्षा अधिक मतदारांची नोंद नसून, केवळ तीन मतदार असल्याची नोंद मतदार यादीत नमूद असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी
जुन्या नाशिकमधील 'त्या' घरावर फक्त तीन मतदारांची नोंद : डॉ. सरदेसाई


नाशिक, 20 ऑक्टोबर (हिं.स.) : जुन्या नाशिकमध्ये एकाच घरात ८०० मतदार असल्याचे वृत्त चुकीचे असून, त्या घरावर ८०० पेक्षा अधिक मतदारांची नोंद नसून, केवळ तीन मतदार असल्याची नोंद मतदार यादीत नमूद असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये दिली आहे.

नाशिक महानगरपालिका आणि मतदार नोंदणी अधिकारी १२४-नाशिक मध्य विधानसभा मतदार संघ यांना याबाबतची पडताळणी करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. त्यांच्या अहवालानुसार १२४-नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील जुने नाशिक या परिसरातील घर क्रमांक ३८९२ हा सिटी सर्व्हे क्रमांक ४९०५/५ मधील असून, त्याचे एकूण क्षेत्र सुमारे १५०१ चौरस मीटर आहे. या ठिकाणी सुमारे ७०० निवासी, अनिवासी या बांधीव मिळकतीत असून, प्रत्येक मिळकतीस मिळकत, इंडेक्स क्रमांक हा वेगळा आहे. म्हणजेच घर क्रमांक ३८९२ ही एकच सदनिका, इमारत नसून त्यात सुमारे ७०० निवासी-अनिवासी या बांधीव मिळकतींचा समावेश आहे. त्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे असल्याचे दिसून येते. घर क्रमांक 5 ३८९२ ही एकच सदनिका, इमारत नसल्याचे, तसेच तेथील मिळकत अनेक व्यक्तींच्या म्हणजेच एकूण साधारण ७०० व्यक्तींच्या नावावर दिसून येत असल्याने एकाच घरात ८०० पेक्षा जास्त मतदार असल्याचे दिसून येत आहे, असे प्रसिद्धिपत्रकात वि म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande