परभणी : मृत्यूनंतर नेत्रदान, अंध व्यक्तींना मिळणार दृष्टी
परभणी, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। एकनाथ नगर येथील कांतीचंदजी कनकमलजी गोलेच्छा (88) यांचे शुक्रवारी निधन झाले. मृत्यूनंतरही कुटुंबीयांनी समाजासाठी अमूल्य योगदान देण्याचा निर्णय घेत सामाजिक जाणीव जपत त्यांच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे अंध व्यक्
अ


परभणी, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।

एकनाथ नगर येथील कांतीचंदजी कनकमलजी गोलेच्छा (88) यांचे शुक्रवारी निधन झाले. मृत्यूनंतरही कुटुंबीयांनी समाजासाठी अमूल्य योगदान देण्याचा निर्णय घेत सामाजिक जाणीव जपत त्यांच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे अंध व्यक्तींना पुन्हा प्रकाशाची अनुभूती मिळणार आहे.

नेत्रदानासाठी घरच्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधला त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सारिका बडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र विभागातील नेत्र शैल्यचिकित्सक डॉ. आरती मुळे, मयूर जोशी, पांडुरंग गजलवाढ यांनी तातडीने त्यांच्या राहत्या घरी जाऊन नेत्र संकलन केले.

जमा केलेली नेत्र बुबूळे जालना येथील नेत्रपेढीकडे पाठवली जाणार आहेत. त्यांचा उपयोग दृष्टीहिनांना दृष्टी देण्यासाठी होणार आहे. या कार्यास डॉ.अर्चना गोरे व राजेश जैन यांचे सहकार्य लाभले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande