सोलापूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसेचा बालेकिल्ला राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचीही ताकद आहे. भाजप-शिवसेना एकत्रित असतानाही १९६० पासून भाजपला सोलापूर जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविता आली नाही. २०१४ नंतर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली. सध्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, पंढरपूर-मंगळवेढा येथे भाजपचे आमदार आहेत. तरीपण, जिल्हा परिषदेवर सत्ता अशक्य असल्याने विरोधी पक्षातील माजी आमदारांना (ज्या तालुक्यात आतापर्यंत भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळाले नाही असे) सोबत घेण्याचा डाव भाजपने आखला आहे.सांगोला व अक्कलकोट तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार आहेत.
दुसरीकडे माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, माळशिरसमध्ये विरोधी पक्षाचे आमदार आहेत. त्यांनाही आपली ताकद, राजकीय अस्तित्व या निवडणुकीत दाखवावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांचा सोलापुरातील माजी आमदारांच्या पक्षांतराचा डाव यशस्वी होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड