सोलापूर, 20 ऑक्टोबर (हिं.स. पंढरपूर कॉरिडॉर प्रकरणी अडीच हजार जणांच्या आक्षेपांवर सुनावणी पूर्ण झाली आहे. लोकांच्या अपेक्षा तसेच त्यांच्या मागण्यांचा अहवाल तयार केला आहे. तो अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी साधारण साडेआठशे ते नऊशे कोटींची अपेक्षा आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्येच पंढरपूर कॉरिडॉरचा समावेश करण्यात आला असून या दोन्ही प्रकल्पासाठी मिळून साधारणतः साडेतीन ते चार हजार कोटींची आवश्यकता लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचा वार्तालाप झाला. याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.
गत महिन्यात सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम दिवाळीपूर्वी शासनाच्या डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सोलापुरात अतिवृष्टीमुळे पुन्हा संकट येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे आराखडा तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड