सोलापूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि यशोधरा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स यांच्यात महत्त्वपूर्ण शैक्षणिक सहकार्याचा सामंजस्य करार झाला. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असलेला डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस हा एक वर्षाचा अभ्यासक्रम सोलापुरात सुरू होणार आहे.हा करार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर आणि यशोधरा हॉस्पिटलचे चेअरमन बसवराज कोलूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे आणि यशोधरा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर पुजारी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी डॉ. विकास पाटील, सीए महादेव खराडे, डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. अभिजीत जगताप व ॲड. जावेद खैरदी आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड