पुणे : झाडावरून खाली कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
पुणे, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका कार्यकर्त्याचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वडगावशेरी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.संतोष कुसाळ (४५, रा
पुणे : झाडावरून खाली कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू


पुणे, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बांधण्यासाठी झाडावर चढलेल्या एका कार्यकर्त्याचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वडगावशेरी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.संतोष कुसाळ (४५, रा. गणेशनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. ते वडगावशेरी येथील एका तरुण मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते होते. काल दिवसभर त्यांनी मंडळातील इतर सदस्यांसह किल्ला बांधण्याचे काम केले. रात्री मोठा आकाशकंदील रस्त्यावर लावण्यासाठी ते झाडावर चढले होते.दोरी बांधताना अचानक त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande