छत्रपती संभाजीनगर, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। वाचनाची भूक भागवण्यासाठी गावकऱ्यांनी मागणी केली आणि त्याप्रमाणे सार्वजनिक वाचनालयाच्या इमारतीसाठी आपण प्रयत्नशील राहिलो आणि त्यामुळे आज त्याला मूर्त स्वरूप झाले असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले.
बाजारसावंगी (ता.खुलताबाद) येथे सार्वजनिक वाचनालयाची भव्य अशी इमारत उभी राहिली असून आज या इमारतीचे लोकार्पण केले. त्यावेळी ते बोलत होते. बाजार सांगवी येथे सार्वजनिक वाचनालयाची इमारत उभी राहिली असून यामुळे वाचकांना निश्चितच सुविधा प्राप्त होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी सभापती श्री.महेश उबाळे, तालुकाध्यक्ष श्री.सुरेश जाधव, सरपंच श्री.आप्पासाहेब नलावडे, युवक तालुकाध्यक्ष श्री.अक्षय नलावडे, श्री.विपिन बारगळ, श्री.अनिल चव्हाण, श्री.मुंजाजी अण्णा नलावडे, श्री.दस्तगीर पटेल, श्री.मुस्ताक पटेल, श्री.संभाजी नलावडे, श्री.प्रकाश नलावडे, श्री.केशव जाधव, श्री.रफिक पटेल, श्री.भगवान कामठे, श्री.आदिनाथ साळुंखे, श्री.संजय काळे, श्री.बाळकृष्ण लोंढे, श्री.सुरेश गायकवाड, श्री.पोपट काटकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis