नांदेड : पुढील काही दिवसात हलका ते मध्यम पावसाचा इशारा
नांदेड, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। पुढील काही दिवसात हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पीक व उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात सोयाबीन पिकाची काढणी मोठ्या प्रमाणावर सुरू अ
नांदेड : पुढील काही दिवसात हलका ते मध्यम पावसाचा इशारा


नांदेड, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।

पुढील काही दिवसात हलका ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी पीक व उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या जिल्ह्यात सोयाबीन पिकाची काढणी मोठ्या प्रमाणावर सुरू असून, हवामान खात्याने पुढील काही दिवसात हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले पिक व उत्पादन सुरक्षित ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे.

काढणीस आलेले सोयाबीन पिक शक्य तितक्या लवकर काढून कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावे. थ्रेशिंगचे काम (दाणे काढणी) हवामान पाहून करावे; पावसाची शक्यता असल्यास टाळावे. उघड्यावर ठेवलेले सोयाबीन दाणे किंवा झडपी पिक ताडपत्री, प्लास्टिक शीट किंवा पॉलिथिन कव्हरने झाकून ठेवावेत.

ओलसर दाणे साठवू नयेत; पूर्ण वाळवूनच साठवण करावी.

साठवलेला शेतमाल उंच जागी व हवेशीर ठिकाणी ठेवावा.

विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू असल्यास शेतात काम टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी थांबावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande