निफाड, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। - दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जिल्ह्यातील निफाड व लगतच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे त्याची शेतकरी हवालदिल झालेले आहेत. निश्चित किती नुकसान झाले याबाबतची माहिती मिळण्यासाठी काहीसा कालावधी जाणार आहे.
मागील काही दिवसांपासून मोसमी पाऊस हा परत केल्याची घोषणा हवामान खात्याकडून करण्यात आलेली होती त्यानंतर मागील आठवड्यामध्ये हवामान खात्याने बे मौसमी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केलेली होती. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी सर्व साधारण पाच वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील निफाड, चांदवड, नाशिक, सिन्नर सह तालुक्यांमध्ये पाऊस झाला लक्ष्मीपूजनाची पूजा करत असतानाच पावसाने दणका दिल्यामुळे परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली नागरिकांनी पूजा सोडून आपल्या शेतातील पीक आणि इतर साहित्य वाचविण्याचा प्रयत्न केला असे दृश्य दिसून येत होते. या बेमोसमी पावसामुळे पिकांवर परिणाम होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV