परभणी, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।
शेततळ्यात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून 47 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना टाकळी कुंभकर्ण येथे घडली. सदर प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गजानन मंचकराव कदम वय 47 वर्ष राहणार टाकळी कुंभकर्ण असे मयताचे नाव आहे. महेश गिराम यांनी याबाबत खबर दिली आहे. त्यांचे मावस भाऊ गजानन हे आपल्या शेतात गेले होते. शेततळ्यात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोना धबडे करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis