अकोला, 21 ऑक्टोबर (हिं.स.) : अकोल्यातील सिव्हिल पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच एका व्यक्तीने गंभीर आरोप केला आहे...त्यामुळे या फिर्यादी व्यक्तीकडून ऐन दिवाळीच्या दिवशीच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं..
अकोल्यातील व्यापारी रघुनाथ अरबट यांच्यासोबत त्यांच्याच मावस भावाकडून 32 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा सिव्हिल पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.. मजुरांच्या मजुरीसाठी दिलेले पैसे सागर कान्हेरकर नामक मावस भावाने हडप करून पळ काढल्याचा आरोप अरबट यांनी केला होताय.. तर सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल झाला. मात्र पोलिसांनी यातील आरोपीला तब्बल सात महिन्यानंतर अटक केली.. तर आरोपिकडून गुन्ह्यातील पैसे रिकव्हर झाले नाहीत तर दुसरीकडे आरोपीची पत्नी तेजस्विनी हिची साधी चौकशीही न झाल्याचे अरबट यांचा आरोप आहे. त्यामुळे आपण या अन्यायाविरोधात आणि पोलिस प्रशासनाच्या निष्क्रीयतेविरोधात दिवाळीच्या दिवशीच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करत असल्याचं फिर्यादी यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार फिर्यादी यांनी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे