बीड, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज दिवाळी शेतकऱ्याच्या बांधावर साजरी केली. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मतदार संघातील आष्टी तालुक्यातील गावांचा दौरा केला आणि तेथे दिवाळी साजरी केली.
सतत पुरेशा पावसाअभावी दुष्काळग्रस्त असलेला शेतकरीराजा आता अतिवृष्टीला सामोरा गेला, न खचता हे संकट त्याने झेलले,आणि नव्या उमेदीने उभा राहतोय शेतकऱ्यांच्या या धैर्याला मानाचा सलाम आहे..
आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मतदार संघातील आष्टी तालुक्यातील दादेगाव, डोंगरगण परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली आणि अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे झालेले नुकसान यांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधत मी सदैव तुमच्या सोबत असल्याचे आश्वासित केले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis