पुण्यात बंगाली बांधवांचा काली माता पूजा उत्सव उत्साहात सुरू
पुणे, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। सध्याच्या काळात सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात वाढलेली गुन्हेगारी पाहता हे शहर भयमुक्त व्हावे, स्वच्छ पुणे, सुंदर पुणे शहर असावे अशी प्रार्थना माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेक
बंगाली बांधवांचा काली माता पूजा उत्सव उत्साहात सुरू


पुणे, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। सध्याच्या काळात सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात वाढलेली गुन्हेगारी पाहता हे शहर भयमुक्त व्हावे, स्वच्छ पुणे, सुंदर पुणे शहर असावे अशी प्रार्थना माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी काली मातेकडे केली.

बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या काली पूजा उत्सवात रविंद्र धंगेकर बोलत होते.

यावेळी पुणे शहर सार्वजनिक काली पूजा कमिटीचे कमिटी चे सेक्रेटरी सुब्रतो मजुमदार,विनोद संतरा- खजिनदार ,अमर माझी-उपसेक्रेटरी ,अनुप माईती - सदस्य , महादेव माझी - सदस्य ,पूनचंद्र दास- सदस्य,संकेत मजुमदार

आणि मान्यवर उपस्थित होते.

मागील पंचवीस वर्षापासून हा उत्सव आपल्या भागात साजरा केला जात असून त्यात अनेक बंगाली बांधव सहभागी होत असतात. महाराष्ट्रात 45 वर्षापासून बंगाली बांधव सोन्याचे कारागीर म्हणून पुणे शहरात कार्यरत असून त्यांच्याशी आपला घरगुती संबंध आहे, असे धंगेकर यांनी नमूद केले.

काली मातेवर श्रद्धा बाळगणाऱ्या बंगाली नागरिकांसाठी आवश्यक त्या उपलब्धता मिळवून देणे हे आपले कर्तव्य असून त्यांच्या भावनांचा आपण आदर करत असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande