बीड : सोयाबीनची ५३२८ रु.प्रति क्विंटल हमीभावाने शासकीय खरेदी
नाफेड नोंदणी सुरू करण्याची मागणी बीड, 21 ऑक्टोबर (हिं.स.)सोयाबीनची ५३२८ रु.प्रति क्विंटल या हमीभावाने शासकीय खरेदी नाफेड नोंदणी तात्काळ सुरू करणे बाबत राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व पणन मंत्री यांना आमदार प्रकाश सोळंके यांनी लेखी पत्र दिले
अ


नाफेड नोंदणी सुरू करण्याची मागणी

बीड, 21 ऑक्टोबर (हिं.स.)सोयाबीनची ५३२८ रु.प्रति क्विंटल या हमीभावाने शासकीय खरेदी नाफेड नोंदणी तात्काळ सुरू करणे बाबत राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व पणन मंत्री यांना आमदार प्रकाश सोळंके यांनी लेखी पत्र दिले आहे.मतदारसंघातील माजलगाव, धारूर व वडवणी ता. वडवणी जि. बीड तालुक्यातील सुमारे 50 टक्क्यांहून अधिक क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सोयाबीनची लागवड करण्यात आलेली आहे.

परंतु या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या उरलेली सोयाबीन काढणी करून विक्रीसाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. दर काळात बाजारभाव अत्यल्प असुन, शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुध्दा परत मिळत नाही. नाफेडच्या माध्यमातुन केंद्र शासनाने जाहिर केलेला हमीभाव रू. 5328/- प्रतिविंटल आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन माजलगाव, धारूर व वडवणी जि. बीड तालुक्यातील नाफेड खरेदी केंद्रावर नोंदणी व शासकीय खरेदी प्रक्रिया तातडीने सुरू करणे अत्यावश्यक आहे.तरी शासनस्तरावर नियमोचीत आवश्यक ती कार्यवाही करून माजलगाव, धारूर व वडवणी तालुक्यातील नाफेड सोयाबीन खरेदी केंद्रांची नोंदणी व प्रत्यक्ष खरेदी तात्काळ सुरू करावी अशी मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande