पुणे, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। सण, संस्कृती आणि समाज प्रबोधन व संघटन यांचा सुंदर संगम सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने दोन दिवसीय दिवाळी पहाट या कार्यक्रमात पहायला मिळाला आहे. या उपक्रमामुळे नव कलाकारांना व्यासपीठ मिळाले, नागरिकांमध्ये सांस्कृतिक चळवळ जागृत करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. मी माझे मित्र सचिन साठे आणि त्यांच्या फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे याबद्दल अभिनंदन करतो, तसेच सर्व नागरिकांना दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो असे गौरवउद्गार आमदार शंकर जगताप यांनी काढले.
दिवाळी निमित्त पिंपळे निलख येथे सचिन साठे सोशल फाउंडेशन तर्फे दोन दिवसीय “शुभ दिवाळी पहाट – फराळ” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. देवांग कोष्टी कार्यालय, शारदा कॉलनी येथे आणि विशाल नगर, पिंपळे निलख येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये संगीत, मैत्री आणि सणाचा उत्साह यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमातील उत्साह शिगेला पोहोचला असताना आमदार शंकर जगताप आणि आयोजक सचिन साठे यांनी आपल्या महाविद्यालयीन काळातील जुन्या आठवणींना उजाळा देत “तेरे जैसा यार कहा, कहा ऐसा याराना, याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना” हे गाणे सादर केले भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी उत्साह वाढवला. या अप्रतिम सादरीकरणाने दोघांच्या मैत्रीतील आपुलकी, जिव्हाळा आणि वर्षानुवर्षांच्या नात्याचा स्नेह प्रकट झाला. उपस्थित प्रेक्षकांनी याला उत्स्फूर्त दाद दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु