छत्रपती संभाजीनगर, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कुटुंबियांची दिवाळी गोड व्हावी यासाठी या कुटुंबीयांसमवेत वैजापूर तालुक्यातील गावात दिवाळी साजरी केली.
सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले होते. या अतिवृष्टीत शेतीसह अनेक ठिकाणी घरादारातील सामान व वस्तु वाहून गेल्या होत्या. शेतकरी बांधवांवर आलेल्या या गंभीर घटनेची दखल घेत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कुटुंबियांची दिवाळी गोड व्हावी यासाठी या कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी केली. अतिवृष्टीने बाधित झालेल्या कुटुंबीयांना किराणा किट, सतरंजी व चादर भेट म्हणून दिल्या.
याप्रसंगी तालुकाप्रमुख सचिन वाणी, विधानसभा संघटक मनाजी मिसाळ, तालुका संघटक मनोज गायके, युवासेना जिल्हाधिकारी विठ्ठल डमाळे,उपजिल्हाधिकारी अक्षय साठे, किशोर हुमे रमेश सावंत, अरुण शेलार, नंदकिशोर जाधव,बाळासाहेब बडक,माणिक निघोटे, कैलास हिवाळे,संतोष साळुंके,अमोल साळुंके,श्रीमान गायके व आण्णासाहेब पवार उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis