लातूर : शहीद पोलिस जवानांना बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना
लातूर, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। पोलिस स्मृतिदिनी 01 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत संपूर्ण भारतात वीरगती प्राप्त झालेल्या 191 पोलिस अधिकारी-अंमलदारांना लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या शहीद स्मारकाला पुष्
अ


लातूर, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। पोलिस स्मृतिदिनी 01 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत संपूर्ण भारतात वीरगती प्राप्त झालेल्या 191 पोलिस अधिकारी-अंमलदारांना लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण आदरांजली वाहण्यात आली. बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. लातूर जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

यावेळी श्री.बाबासाहेब पाटील, मंत्री (सहकार) महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहीद पोलीस जवानांना आदरांजली वाहून मानवंदना दिली व देशासाठी बलिदान दिलेल्या पोलिसांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी पोलिस अधीक्षक श्री. अमोल तांबे,अपर पोलिस अधीक्षक श्री.मंगेश चव्हाण यांचेसह जिल्ह्यातील सर्व ठाण्याचे व सर्व शाखाचे पोलिस निरीक्षक, प्रभारी अधिकारी उपस्थित होते.01 सप्टेंबर 2024 ते 31ऑगस्ट 2025 या कालावधीत भारताच्या विविध राज्यामधील पोलिस ठाणे तसेच विशेष पथकांमध्ये कर्तव्य बजावत असताना 191 वीर पोलिस अधिकारी व अंमलदार शहीद झाले होते. शौर्याची गाथा इतरांना कळावी तसेच राष्ट्रनिष्ठा, कर्तव्य निष्ठ भावनेची ज्योती प्रत्येकाच्या मनात तेवत राहावी यासाठी शहीद पोलिस जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande