नाशिक, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। विजन्स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनतर्फे रुंगटा विद्यालयात सुमारे २०० नागरिकांसाठी सीपीआर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. - या उपक्रमात कोविड-१९ बाधितांच्या पत्नी व मुलांनी सहभाग घेतला. - डॉ. सृष्टी विजन यांनी हँड्स-ओन्ली सीपीआर आणि एईडी उपकरणाच्या - वापराबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. दिव्यचेतना फाउंडेशनच्या सहकार्याने - आणि नाशिक लेडीज सर्कल ११९ व राउंड टेबल १०७ च्या पाठबळाने हा - उपक्रम पार पडला.
डॉ. विजन म्हणाल्या, की सीपीआरचे ज्ञान हे प्रत्येक नागरिकाचे जीवनदायी कौशल्य बनले पाहिजे. नाशिकला हृदय सुरक्षित शहर बनविण्याच्या उद्देशाने फाउंडेशनने आतापर्यंत हजारो नागरिकांना प्रशिक्षण देत विविध सार्वजनिक ठिकाणी एईडी उपकरणे बसवली आहेत. या कार्यक्रमात लेडीज सर्कलच्या अध्यक्षा शीतल रावल यांनी एका मुलाच्या शिक्षणासाठी निधी दान केला. दिव्यचेतना फाउंडेशनचे मधुकर ब्राह्मणकर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV