बीड, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे जाऊन गडावर सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. या कामांमुळे स्थानिक परिसरातील सोयी-सुविधा अधिक सुधारल्या जातील, तसेच येथील पर्यटन आणि धार्मिक महत्त्व वाढेल.असे त्यांनी सांगितले.
यावेळी मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि गडावर होणाऱ्या कामांमुळे भाविकांना व स्थानिक नागरिकांना आगामी काळात सर्व सोयीसुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगत या कामी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis