“माझे मत माझे आहे; मला व्यक्तीस्वातंत्र्य आहे” – महेश कोठारे
मुंबई, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावरून उभ्या झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. कोठारे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “हे माझं प्रामाणिक आ
Sanjay Raut  and Mahesh kohare


मुंबई, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यावरून उभ्या झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. कोठारे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “हे माझं प्रामाणिक आणि खरं मत आहे. मी माझं मत व्यक्त करू शकतो, मला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. जे मी म्हटलं ते मनापासून म्हटलं. त्यामुळे इथे राजकारणाचा संबंध येत नाही.”

महेश कोठारे यांनी याबाबत सांगितले, “मी एक नागरिक म्हणून माझं मत व्यक्त केलं. संजय राऊतांनी जे म्हटलं, ते त्यांचं मत. त्यांचं मत त्यांनी मांडलं, माझं मत मी मांडलं. संजय राऊत यांचाही मी खूप आदर करतो, पण माझं मत हे माझं मत आहे.”कोठारे हे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सांगितले होते, “भाजप म्हणजे आपले घर आहे. मी स्वतः भाजपचा भक्त आहे, पंतप्रधान मोदींचाही भक्त आहे. इथून नगरसेवक आणि महापौर निवडून येतील, आणि भविष्यात मुंबईत कमळ फुलेल.”

यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महेश कोठारे यांच्यावर टीका करत म्हटले होते की, “तुम्ही कलाकार आहात. जर असे बोलत राहिलात, तर रात्री येऊन तो तुम्हाला चावेल आणि गळाही दाबेल.” मात्र महेश कोठारे यांनी यावर शांत प्रतिसाद देत वाद टाळला आणि आपले मत कायम ठेवले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande