लातूर - महेश पतसंस्था व दसरा महोत्सव समितीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
लातूर, 21 ऑक्टोबर, (हिं.स.) - महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने, त्यांना तात्काळ मदत मिळावी या उदात्त हेतूने अहमदपूर येथील महेश नागरी सहकारी पतसंस्था आणि सार्वजनिक दसरा महोत्सव समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी भरीव आर
अ


लातूर, 21 ऑक्टोबर, (हिं.स.) - महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने, त्यांना तात्काळ मदत मिळावी या उदात्त हेतूने अहमदपूर येथील महेश नागरी सहकारी पतसंस्था आणि सार्वजनिक दसरा महोत्सव समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी भरीव आर्थिक मदतीचा हात दिला आहे.

​महेश नागरी सहकारी पतसंस्थेने शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रु. २ लाख ५१ हजार (दोन लाख एकावन्न हजार) रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. पतसंस्थेचा हा मदतीचा धनादेश राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. शेतकऱ्यांच्या पाठीशी पतसंस्था नेहमी उभी राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

​याचबरोबर, अहमदपूर येथील सार्वजनिक दसरा महोत्सव समितीनेही सामाजिक बांधिलकी जपत अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासाठी रु. ५१ हजार (एकावन्न हजार) रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रदान केला. हा धनादेश देखील सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांना देण्यात आला.

​यावेळी अहमदपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे, दसरा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, शिवानंद हेंगणे, ओम पुणे, साईनाथ पाटील, पापा अय्या, शिवकुमार उटगे, राम पाटील, सुभाष गुंडीले, विश्वभंर स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पतसंस्था आणि दसरा महोत्सव समितीने संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी केलेल्या या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande