चुकीचे आयकर विवरणपत्र भरल्या प्रकरणी नागरिकांना नोटीसा
नाशिक, 21 ऑक्टोबर (हिं.स.) : देशाच्या प्रगतीसाठी आयकर भरा असे सातत्याने सांगितले जाते पण त्यामध्ये असलेल्या नियमांच्या त्रुटीचा काही कर सल्लागारांनी फायदा घेऊन टक्केवारी घेण्यासाठी म्हणून बदल केल्याचे समोर आले आहे याप्रकरणी आता आयकर विभागाने अशा कर
चुकीचे आयकर विवरणपत्र भरल्या प्रकरणी नागरिकांना नोटीसा


नाशिक, 21 ऑक्टोबर (हिं.स.) : देशाच्या प्रगतीसाठी आयकर भरा असे सातत्याने सांगितले जाते पण त्यामध्ये असलेल्या नियमांच्या त्रुटीचा काही कर सल्लागारांनी फायदा घेऊन टक्केवारी घेण्यासाठी म्हणून बदल केल्याचे समोर आले आहे याप्रकरणी आता आयकर विभागाने अशा कर सल्लागारांना तसेच कराची चोरी करणाऱ्या नागरिकांना नोटीसा धाडल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामधून मोठे घबाड येणाऱ्या काळात आयकर विभागाच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

या सर्व प्रकरणाबाबत उपलब्ध झालेली अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील काही नागरिकांनीबनावट किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे आयकरात सूट व कपात दावा करून बेकायदेशीर परतावा मिळविल्याचे तपासातून उघड झाले आहे. संबंधित व्यक्तींना नोटीस पाठवण्यासह करसल्लागाराच्या कार्यालयात आयकरखात्याच्या अधिकाऱ्यांनी धडक दिली आहे. केवळ टक्केवारीसाठी बनावट परतावा मिळवण्याचे प्रताप करणारे करसल्लागार रडारवर आले आहेत . राज्यातील काही कर सल्लागारांनी अशा प्रकारे भरलेल्या कराचा परतावा मिळवण्यासाठी करदात्यांशी काही टक्के रकमेच्या मोबदल्यावर केलेली डील उघड होऊ लागली आहे. अनेक करदात्यांनी त्यांच्या नोकरीदार संस्थेने जारी केलेल्या फॉर्म १६ मधील माहितीशी न जुळणाऱ्या बोगस कपानी त सट दाखतन आयकर रिटर्न भरल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे प्राप्तिकर विभागाला नुकसान झाले आहे. या कपातीसाठी जोडण्यात आलेल्या पावत्यांची सत्यता पडताळण्याचे काम सुरू झाले असून उत्तर महाराष्ट्रात अनेक नोकरदार करदात्यांतर कारवाई होणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे बनावट किंवा चुकीची माहिती देऊन आयकर रिटर्न दाखल करणे हा गुन्हा आहे. नियमानुसार, त्यांना बेकायदेशीर दावे दुरुस्त करून सुधारित रिटर्न दाखल करावा, तसेच संबंधित कर व व्याज भरून संशोधित माहिती विभागाला सादर करावी, असा इशारा देणारी नोटीस आयकरखात्याने संबंधित नोकरदारांना बजावली आहे. त्यामुळे खोटे विवरणपत्र दाखल करणारे करसल्लागार रहातर आले आहे.

नियमांचा घेतला आधार

या विववरणपत्रांमध्ये रिफंड मिळवण्यासाठी करसल्लागारांनी ८० जी, ८० सी, ८० डी, डीडी यासारख्या कलमांचा आधार देत देणग्या आणि मेडिकलसह घरभाडे भरल्याच्या बनावट पावत्या सादर केल्याचे उघड झाले आहे. याची सखोल चौकशी झाल्यास संबंधित संस्था आणि रुग्णालयेही रडावर येण्याची दाट शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande