पुणे -मुद्रांक शुल्क प्रकरणांसाठी विशेष मोहीम
पुणे, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। मुद्रांक शुल्काच्या पुणे विभागातील प्रलंबित १ हजार ८७४ प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम मुद्रांक शुल्क विभागाने हाती घेतली आहे. त्यानुसार येत्या २७ ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार अस
पुणे -मुद्रांक शुल्क प्रकरणांसाठी विशेष मोहीम


पुणे, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। मुद्रांक शुल्काच्या पुणे विभागातील प्रलंबित १ हजार ८७४ प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम मुद्रांक शुल्क विभागाने हाती घेतली आहे. त्यानुसार येत्या २७ ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत झिरो पेंडन्सी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

‘मुद्रांक विभागाच्या मुद्रांक परताव्याची मार्च अखेरपर्यंत १७ हजार १३६ इतकी प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी सप्टेंबर अखेरपर्यंत ७४ टक्के म्हणजे १२ हजार ८४६ इतकी प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. आता ४ हजार २९० इतकी प्रकरणे प्रलंबित आहेत. यामध्ये सर्वाधिक पुणे विभागातील १ हजार ८७४ प्रकरणे प्रलंबित असून, त्या पाठोपाठ मुंबईत ८४६, नाशिकमध्ये ६५० प्रकरणे प्रलंबित आहेत,’ अशी माहिती नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande