छत्रपती संभाजीनगर, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास भुमरे यांनी पैठण येथे दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे इंडियन आयडॉल मराठी फेमचे सुप्रसिद्ध गायक अविनाश जाधव
उपस्थित होते.
प्रकाशाचे पर्व घेऊन आलेल्या दीपावलीचे सप्तस्वरांनी स्वागत करण्यासाठी सुरेल स्वरांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला 'दिवाळी पहाट कार्यक्रम अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
इंडियन आयडॉल मराठी फेमचे सुप्रसिद्ध गायक अविनाश जाधव यांच्या जादुई स्वरांनी नटलेल्या संपूर्ण कार्यक्रमाला स्वर्गीय अनुभूतीचे कोंदण प्राप्त करून दिले. याचबरोबर उपस्थित सर्व नागरिक, माता-भगिनींना याप्रसंगी दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
----------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis