लातूर - जिल्हास्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत यशवंत विद्यालयाचे भरीव यश
लातूर, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य कला संचालनालय व कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ''बाल चित्रकला स्पर्धा २०२५'' मध्ये अहमदपूर येथील यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा पांडुरंग
अ


लातूर, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य कला संचालनालय व कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या 'बाल चित्रकला स्पर्धा २०२५' मध्ये अहमदपूर येथील यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा पांडुरंग नारायण मचकंटे याने प्रथम क्रमांक, तर अवनीश गिरीश गोंटे याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.

​प्रतिवर्षी शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणारी ही परीक्षा बालवयातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण चित्रकला स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत सहभागासाठी विद्यार्थ्यांनी कला शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. महाराष्ट्रात पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये एकूण चार गट होते. त्यापैकी, तिसऱ्या गटातून (इयत्ता ५ वी ते ७ वी) अवनीश गिरीश गोंटे याने तृतीय क्रमांक पटकावला, तर चौथ्या गटातून (इयत्ता ८ वी ते १० वी) पांडुरंग नारायण मचकंटे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाचा गौरव वाढवला.

​या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांना कला शिक्षक महादेव खळुरे व सतीश बैकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेच्या जिल्हास्तरीय निकालाचे गुणवत्ता परीक्षण शिवाजी हांडे, अशोक तोगरे, महादेव बनाळे, आणि तेजस शेरखाने यांनी केले.

​विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल डायटचे प्राचार्य डॉ. मारोती सलगर, माध्यमिक शिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती, प्राथमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, अहमदपूरचे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, आदींनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande