नाशिक - रेल्वे महाव्यवस्थापकांकडून कुंभमेळा तयारीचा आढावा
नाशिक, 21 ऑक्टोबर, (हिं.स.) - नाशिकमध्ये सन २०२७ मध्ये कुंभमेळा होत आहे. त्यासाठी रेल्वेने देशभरातून लाखो भाविक येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी मुंबई मुख्यालयातील विभागप्रमुख, भुसावळ विभागीय रेल्वे व्यव
रेल्वे महाव्यवस्थापकांकडून कुंभमेळा तयारीचा आढावा


नाशिक, 21 ऑक्टोबर, (हिं.स.) - नाशिकमध्ये सन २०२७ मध्ये कुंभमेळा होत आहे. त्यासाठी रेल्वेने देशभरातून लाखो भाविक येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी मुंबई मुख्यालयातील विभागप्रमुख, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत नाशिकरोड, देवळाली कॅम्प, ओढा, कसबे सुकणे आणि खेरवाडी या रेल्वे स्थानकांतील विकास कामे व सुविधांची पाहणी केली.

या निरीक्षण दौऱ्याचा उद्देश भाविकांच्या सुरक्षित, सुलभ व सुगम प्रवासासाठी आवश्यक सुविधापायाभूत विकास व रेल्वे संचालन व्यवस्थांचा आढावा घेणे हा होता.

कुंभमेळ्यादरम्यान देश विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या दृष्टीने प्रवासी सुविधा, प्लॅटफॉर्मची क्षमता, स्वच्छता, पिण्याचे पाणी, तिकीट खिडक्या, माहिती प्रणाली, गर्दी व्यवस्थापन, होल्डिंग एरियाची तयारी तसेच रेल्वे ऑपरेशन्स यावर विशेष भर देण्यात आला आहे. महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी नाशिकह्नभुसावळ विभागाचे विंडो ट्रेलिंग निरीक्षण करताना चालू असलेल्या विविध कामांचा आढावा

घेतला. यामध्ये रेल्वे रूळांची स्थिती, स्थानक परिसर, ओव्हरहेड इलेक्ट्रिक यंत्रणा, लेव्हल क्रॉसिंग व महत्त्वाच्या सुरक्षा रचनेचे बारकाईने निरीक्षण यांचा समावेश होता. भुसावळ विभाग कुंभमेळा २०२७ यशस्वी करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांची सुरक्षा, सुविधा व सुरळीत वाहतुकीसाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारणीसह समन्वित पद्धतीने सातत्याने प्रयत्नशील आहे, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande