पुणे, 21 ऑक्टोबर (हिं.स.)उत्सवाच्या काळात वाढती मागणी लक्षात घेत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून हजूर साहिब नांदेड विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. त्यानुसार गाडी क्रमांक ०७६०७ नांदेड ते हडपसर विशेष रेल्वे २८ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ८.३० वाजता नांदेडमधून निघून त्याच दिवशी रात्री ९.४० वाजता हडपसरला पोहोचेल. गाडी क्रमांक ०७६०८ हडपसर ते नांदेड ही गाडी २८ ऑक्टोबरपर्यंत रात्री २२:५० वाजता हडपसरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२:१५ वाजता नांदेडला पोहोचेल.
ही गाडी पूर्णा जंक्शन, परभणी जंक्शन, गंगाखेर, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्सी टाउन, कुर्डुवाडी जंक्शन आणि दौंड जंक्शन या स्थानकांवर थांबेल. या गाडीला २२ एलएचबी डब्बे असतील. यात एक फर्स्ट एसी, दोन एसी २-टायर, सहा एसी ३-टायर, एक पॅन्ट्री कार, सहा स्लीपर क्लास, चार जनरल सेकंड क्लास आणि दोन जनरेटर व्हॅन कोचचा समावेश असेल. हडपसर ते नांदेड या गाडी क्रमांक ०७६०८चे बुकिंग २० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता सर्व पीआरएस स्थानकांवर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल. जनरल सेकंड क्लास डबे अनारक्षित कोच म्हणून चालवले जातील आणि यूटीएस सिस्टमद्वारे बुक करता येतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु