नांदेड, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हदगाव तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निमित्ताने आढावा बैठक संपन्न झाली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संपूर्णपणे जिंकण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे. झालेल्या बैठकीत हदगाव नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
या बैठकीला आमदार बाबुराव कदम कोहळीकर,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर, जिल्हाप्रमुख विवेक देशमुख जेष्ठ शिवसैनिक संभा मामा लांडगे, गोपाल सारडा,माजी सभापती बाबूसराव कदम, के.डी. पवार ,पांडुरंग कोल्हे मामा,शहर प्रमुख बबनराव माळोदे,युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसणीकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शितलताई भांगे, शहर प्रमुख सविताताई गिरबीडे,अश्विनीताई गिरी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis