नांदेड : आगामी निवडणुका बहुमताने जिंकण्याचा राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत निर्धार
नांदेड, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। चिखली ता. कंधार येथील आढावा विशेष बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बहुमताने जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोहा कंधार विधानसभा मतदारस
अ


नांदेड, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। चिखली ता. कंधार येथील आढावा विशेष बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बहुमताने जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील चिखली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक संपन्न झाली आहे.

या बैठकीमध्ये विशेषत्वाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने आढावा घेण्यात आला आहे या बैठकीसाठी नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या बहुमताने जिंकण्याचा निर्धार केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande