मनमाड, 21 ऑक्टोबर (हिं.स.)
प्रकाशाचा आणि तेजाचा सण दिवाळी, आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. दिवाळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय. आज संपत्तीची देवता लक्ष्मीचं पूजन केलं जातं.प्रत्येकाने वंचितांच्या, दुःखितांच्या आयुष्यात आनंद आणण्याचा प्रयत्न करावा, दिवाळीमुळे सामान्य जनतेला निराशेवर मात करण्याचं बळ मिळतं, तसेच महाराष्ट्रात आज नरकचतुर्दशी निमित्त पहाटे चंद्रोदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करण्याची पद्धत आहे.आज शहरातील बाजारपेठ फुलून निघाली होती तर नवीन कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच मोबाईल सह नवीन वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती.तसेच पूजेचे साहित्य खरेदीसाठी महिलां वर्गासह पुरुष मंडळीची गर्दी बाजपरपेठेत बघावयास मिळत होती.
आज सकाळपासूनच सर्वांनी उत्साहाने दिवाळी साजरी केली आणि एकमेकांना फराळासह शुभेच्छा दिल्या. घरोघरी कंदील आणि पणत्यांची रोषणाई लक्ष वेधून घेत होती.तर रस्ते रांगोळ्यांनी सजले होते.वर्षाचा सर्वात मोठा सण म्हणून दिवाळी साजरी करण्यात येते दिवाळी ही गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वचजण साजरी करतात सर्वजण आपापल्या परीने दिवाळी सण साजरा करतात.मनमाड शहरातील मुख्य बाजारपेठ कालपासूनच गच्च भरली आहे नवीन कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल फोन तसेच नवीन वाहन खरेदीसाठी दिवाळी हा चांगला मुहूर्त असल्याने आज सकाळपासून या सर्व दुकानात ग्राहकांनी गर्दी केली होती तर सोनं खरेदीसाठी देखील आजचा मुहूर्त असल्याने सराफ बाजारात देखील मोठया प्रमाणावर गर्दी बघावयास मिळत होती अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तर अनेकांनी सोशल मीडियावर शुभेच्छा देत दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला.कालपासून सुरू झालेल्या दिवाळी सणासुदीला सासुरवाशीण माहेरी आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे तर बस स्थानक व रेल्वे स्थानक गर्दीन फुलले आहे.
रेडिमेड फराळ करण्यासाठी महिलांची गर्दी...!
दिवाळीच्या निमित्ताने मिठाई फरसाण शेव चिवडा चकली लाडू यासह इतर खाद्यपदार्थ फराळ म्हणून करण्यात येतात गेल्या अनेक वर्षांपासून आता रेडिमेड फराळ बाजारात विकत मिळते प्रत्येक वार्डात आता हे फराळ बनवण्यासाठी भट्टी लागतात किराणा माल घेऊन जायचा व फराळ घेऊन यायचे असा नवीन ट्रेंड सुरू आहे आणि याच दुकानावर रेडिमेड फराळ बनवण्यासाठी महिलांची गर्दी बघायला मिळाली.
मोबाईल व बाईक घेण्यासाठी तुफान गर्दी...!
दसरा व दिवाळी या शुभमुहूर्तावर नवीन मोबाईल फोन व नवीन वाहन खरेदीसाठी गर्दी होते या शुभमुहूर्ताचा व्यापारी व ग्राहक यांना फायदा असतो यामुळे अनेक व्यवसायिक मोबाईल खरेदी व वाहन खरेदीसाठी अनेक ऑफर ठेवतात यामुळे शहरातील अनेक मोबाईल शॉप व बाईकच्या शोरूमवर तुफान गर्दी बघायला मिळाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV