नाशिकमधील मंदिरांना रोषणाईमुळे झळाळी
नाशिक, 21 ऑक्टोबर, (हिं.स.) : दिव्यांचा सण असलेल्या दीपोत्सवामुळे शहरात चैतन्याची अनुभूती पाहावयास मिळत आहे. विविध मंदिरांवर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिरे झळाळून निघाली आहेत. दिवाळी म्हणजे प्रकाशपर्व. हिंदू बांधव हा सण अतिशय
मंदिरांना रोषणाईमुळे झळाळी !


नाशिक, 21 ऑक्टोबर, (हिं.स.) : दिव्यांचा सण असलेल्या दीपोत्सवामुळे शहरात चैतन्याची अनुभूती पाहावयास मिळत आहे. विविध मंदिरांवर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिरे झळाळून निघाली आहेत.

दिवाळी म्हणजे प्रकाशपर्व. हिंदू बांधव हा सण अतिशय उत्साहात आणि जल्लोषात साजरा करतात. वसुबारसपासून या सणाला प्रारंभ होतो. तेजोमय सण असलेल्या दिवाळीत सर्वत्र विद्युत रोषणाईबरोबरच घराचे अंगणही उजळून निघते. घरोघरी पणत्या लावून, तसेच अंगणात आकर्षक रांगोळी काढली जाते. दीपोत्सवात शहरातील मंदिरांवरही आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळे मंदिरांमध्ये सध्या लखलखाट पाहावयास मिळत आहे. श्री काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराजाचे मंदिर, सोमेश्वर मंदिर, स्वामिनारायण आदी मंदिरांवर करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिरे उजळून निघाली आहेत. अयोध्येमध्ये शरयू तटावर लाखो दिवे प्रज्वलित करण्यात आल्यामुळे शरयूचा तट उजळून निघाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नाशिक शहरातसुद्धा सध्या दिवाळीमुळे मंदिरांवर करण्यात आलेल्या रोषणाईमुळे संपूर्ण परिसर तसेच फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे आसमंत उजळून निघाला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande