कोल्हापूर - टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू; एक जखमी
कोल्हापूर, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। उलट्या दिशेने आलेल्या टेम्पोने समोरून आलेल्या दुचाकीस धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील भाऊ श्रीकांत व बहिण दिपाली यांचा जागीच मृत्यू झाला. तर अथर्व आणि कौशिकी ही मुले गंभीर जखमी झाली. कोल्हापूर-राधानगरी रोडवर कौलव येथ
कौलव जवळ भिषण अपघात


कोल्हापूर, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। उलट्या दिशेने आलेल्या टेम्पोने समोरून आलेल्या दुचाकीस धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील भाऊ श्रीकांत व बहिण दिपाली यांचा जागीच मृत्यू झाला. तर अथर्व आणि कौशिकी ही मुले गंभीर जखमी झाली. कोल्हापूर-राधानगरी रोडवर कौलव येथे आज, मंगळवार सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. यातील एकाचा हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. ऐन दिवाळीतच अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीकांत कांबळे हे बहिण दिपाली पुतण्या अथर्व आणि भाची कौशिकी यांना एकाच मोटरसायकलवर घेवून दिवाळी सणाचा बाजार घेण्यासाठी भोगावती येथे गेले होते. बाजार करुन घरी परतताना समोरून उलट्या दिशेने आलेल्या टेम्पोने श्रीकांत यांच्या दुचाकीस धडक दिली. या धडकेत श्रीकांत व त्यांची बहिण दिपाली यांचा जागीच मृत्यू झाला. तर अथर्व आणि कौशिकी गंभीर जखमी झाले.

जखमींना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला होता. अपघातस्थळी मोठी गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande