सोलापूर, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। दीपावलीच्या पवित्र पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या वतीने मंदिरात व मंदिरावर लक्ष्मीपूजनानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीत वैभव, भक्ती आणि सौंदर्य यांचा सुंदर संगम साधण्यात आला आहे. या फुलांचा सुगंध दरवळत असल्याने आणि ही सजावट पाहून दर्शनासाठी आलेले भाविक मनोमनी धन्यता मानत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सदर सजावट श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त अर्जुन हनुमान पिंगळे (रा. बीड) यांच्या मार्फत करण्यात आली आहे. सजावटीसाठी सुमारे १५०० ते २००० किलो इतक्या प्रमाणात विविध प्रकारची ताजी फुले वापरण्यात आली आहेत.
कोंडा, शेवंती, अष्टर, गुलाब, ऑर्किड, अँथोनीयम, जिप्स, सायकस, गुलछडी, इत्यादी फुलांचा समावेश असून या सर्व फुलांद्वारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग, सुगंध आणि भक्तीभावाने उजळून निघाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड