नाशिक, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। - त्र्यंबकेश्वर नासिक रस्त्यावरील शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून ही दिवाळी काळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी या रस्त्यावरती रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांची समजूत काढण्यात येत असून पुढील आंदोलन यापेक्षाही तीव्र होणार असल्याची माहिती या मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी दिली आहे. सिंहस्थ कुंभ पर्वासाठी नाशिक त्रंबक रस्ता हा सहा पदरी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे त्यासाठी नाशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या कामाला सुरुवात झाली असून सर्वसाधारण मागील सहा दिवसांपूर्वी नाशिक विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नाशिक ते त्र्यंबकेश्वर या परिसरातील नागरिकांच्या जमिनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे त्यानंतर येथील नागरिकांनी तीव्र विरोध करत हे काम थांबविले होते आणि आमच्या जमिनी या अतिक्रमणित नसून स्वतःच्या जमिनी आहेत शासन आमचे नुकसान करीत आहेत अशा स्वरूपाचा आरोप करण्यात येत आहे तरी देखील नाशिक विकास प्राधिकरणाने जमिनीत ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे त्याबाबतची कारवाई सुरू आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच शासनाने शेतकरी ग्रामस्थ व्यावसायिक यांची फसवणूक केली त्यांचे नुकसान केले म्हणून शासनाचाही निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून नाशिक त्रंबकेश्वर या परिसरातील शेतकरी ग्रामस्थ आणि व्यवसाय यांनी ही दिवाळी काळी दिवाळी म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला होता त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मंगळवारी सर्वसाधारण दहा वाजेच्या सुमारास नाशिक त्रंबक रस्त्यावरील जकात नाक्या पुढे असलेल्या भागांमध्ये या परिसरातील नागरिक एकच राहिले आणि त्यांनी या परिसरातील आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले त्यामुळे या परिसरात वाहतूक ठप्प झालेली होती . शेवटी नाशिक विकास प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे त्यानंतर हे आंदोलन थांबविण्यात आले आहे यापुढे अजून उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. -------------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV